27 Apr 2016

कविता: आज वेळ बदललि


आज वेळ बदललि
हेवेदावे आले ओठी
धरतीही दुभंगली
लेका घेई माय पोटी

आभाळाच्या गर्भामधे
पाणी झुरल झुरल
जणू आईच्या पान्ह्याला
अंधारानेच घेरलं

नाही पान्हा नाही ओठ
गळा झाडाला टांगला
झाडानेच माणसाला
दिली शेवटची साथ

या झाडालाच त्याने
आधी ओरबाडलेल
दुखः झाडाचं वाळल
प्रेम कधी न संपलं

- हेरंब
ISupportNAAM

No comments: