19 Apr 2019

जागतिक पुस्तक दिन विशेष | लोकप्रभा लेख


युनेस्को आयोजित जागतिक पुस्तक दिन १९९५ पासून दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईट अशा अनेक विषयांकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने हा दिवस महत्वाचा ठरतो.

१४५५ साली जरी जोहान्न गुटेनबर्गने पहिले पुस्तक छापले असले तरी त्यापूर्वीपासून अक्षरवेडाने झपाटलेला माणूस विविध माध्यमे वापरून आपली बौद्धिक आणि मानसिक भूक भागवत होता. पण खरा कहानी मे ट्विस्ट आला तो डिजीटल क्रांती झाल्यावर. या क्रांतीमुळे वाचक आणि लेखकांवर झालेल्या परिणामाचा आढावा घेण्याच्या प्रयत्नातून सदर लेख दिनांक २६ एप्रिल २०१९ च्या लोकप्रभा अंकात प्रसिद्ध झालाय.

लेख वाचण्याकरिता या संकेतस्थळावर क्लिक करा आणि आपला प्रतिसाद खालील कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.
- The Last Nomad

15 Apr 2019

Review: Kali Jogin - Marathi

Kali Jogin - Marathi Kali Jogin - Marathi by Narayan Dharap
My rating: 4 of 5 stars

धारपांच्या कथांवर आजवर बऱ्याच दूरदर्शन मालिका, चित्रपट आणि नाटके बेतली आहेत. तरीही त्या कथा मूळ स्वरुपात वाचण्याचा आनंद वेगळाच आहे. मराठी साहित्यात भय कथा किंवा गूढ कथा लिहिणारे लेखक फार कमी आहेत. त्यात अशा साहित्याकडे पाहण्याचा इतर लेखकांचा, टीकाकारांचा आणि वाचकांचाही दृष्टीकोन वेगळा असतो. या साहित्याला पुष्कळदा सामान्य किंवा लोकप्रिय साहित्य समजून दुय्यम दर्जा दिला जातो.

पण गूढ कथा लिहिण्याचा उद्देश केवळ वाचकाच्या मनात भीती निर्माण करणे हाच समजलो तर ते योग्य ठरणार नाही. धारपांच्या "काळी जोगीण" या कथेविषयी इतके नक्कीच सांगता येईल कि भीती च्या कक्षा ओलांडून, ही कथा तुम्हाला तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींचा पुन्हा एकदा तर्काच्या आधारावर पडताळून पाडण्यास भाग पडेल.

View all my reviews

30 Mar 2019

हे बंध रेशमाचे [अतिथी लेखक: गिरीश सुखठणकर]१० ऑक्टोबर १९७८ ची संध्याकाळ मी कधीही विसरू शकणार नाही. माझी पत्नी सौ. शुभदा आणि मी, गंगाधर निवास, दादर च्या गॅलरी मध्ये उभे राहून पावसाची मजा पाहत होतो. हवेतला गारवा मनातील उत्कंठेला गुदगुल्या करत होता. मला शुभदा बऱ्याच दिवसापासून आवडायची पण तिला कसे विचारावे या तगमगितच १ वर्ष निघून गेले. पाऊस हा प्रेमवीरांचा आवडता ऋतू का असेल याचा प्रत्यय येत होता. एकमेकांबद्दल प्रकट न केलेल्या भावना या ऋतूत अंकुरित होत होत्या. त्या दिवशी मात्र मी धीर करून शुभदाला विचारले, 'माझ्याशी लग्न करशील का?'. तिनेही लगेच होकार दिला. आपल्या माणसाच्या फक्त समोर असण्यानेच चिंब पावसातही एक वेगळीच उब जाणवू लागते याचा अनुभव मी घेत होतो. संपूर्ण आभाळ ढगाळ असतानाहि शुभदाच्या चेहरा पाहून माझ्या मनात, छोटा गंधर्वांचं, 'चांद माझा हा हसरा' हे पद आपोआप वाजू लागलं होत. त्यावेळी तिचे वय होते १६ वर्षे आणि माझे २१ वर्षे. दोघांच्याही घरून होकार आला आणि ३० मार्च १९८० रोजी आमचा विवाह झाला.  पण लग्न म्हणजे नेमकी काय चीज असते हे समजावणारी खरी गम्मत पुढे घडणार होती. शुभमंगल सावधान!
लग्नापासून आम्ही कायम माझ्या आईवडिलांबरोबर राहिलो. माझी मोठा ब्लॉक घेण्याची ऐपत असतानाही, शुभदा केवळ माझ्या आईवडिलांच्या आग्रहासाठी गंगाधर निवास चाळी मध्ये सन २००१ पर्यंत कुठलीही कुरबुर न करता राहिली. काही शब्दांची आपल्याला जरी तोंड ओळख असली तरी त्यांचा अर्थ कळण्यासाठी आयुष्य खऱ्या अर्थाने जगावं लागत हे आज कळतंय.

माझ्या आईवडिलांच्या आजारपणात कोणतीही तक्रार न करता तिने त्यांची सेवा केली. माझे वडील ७ वर्षे अर्धांगवायूमुळे आजारी होते त्यांचीही सर्व सेवा केली. या सर्व गोष्टी चालू असताना माझ्या दीप्ती व रिद्धी या दोन्ही मुलींना मोठे करण्याची जवाबदारी सुद्धा तिने योग्य प्रकारे पार पाडली. हि तारेवरची कसरत करत असताना स्वतःच्या शांत टेक्स हा साड्यांचा व्यवसायही ती सांभाळत होती. खऱ्या अर्थाने ती अष्टभुजा होती कि काय असा विचार आता मनात येतो आणि माझे मलाच हसू येते. महाराष्ट्र व्यापारी पेठ, दादर, इथे तिने सलग १९ वर्षे हा व्यवसाय यशस्वीरित्या करून घरखर्चालाही हातभार लावला. माझे मॅट्रिक नंतरचे अपुरे राहिलेले शिक्षणसुद्धा केवळ तिच्याच पाठिंब्यामुळे मी पूर्ण करू शकलो. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्री असते हे माझ्या बाबतीत खोटे ठरते, कारण शुभदा कायम, मागे नसून, माझी सोबती होती. उलट तिनेच मला मार्ग दाखवला असे म्हणणेच योग्य ठरेल.

आईवडिलांच्या निधनानंतर आम्ही ठाण्याला नवीन जागी राहायला आलो. नंतर दोन्ही मुलींची लग्ने झाली. आज आम्हाला एक नातू आणि एक नात आहे. हा आमचा समृद्ध कुटुंबवृक्ष वाढवण्याचे श्रेय अर्थातच तिला जाते.
मी नुकताच निवृत्त झालो यावर माझाच विश्वास बसत नाहीये कारण शुभदा कधीच निवृत्त होणार नाही याचा प्रत्यय मला रोज येतो. सध्या मी तिच्या नवीन मसाले उत्पादनाच्या व्यवसायाला हातभार लावतो.
आम्हा दोघांमध्ये सध्या एक गमतीशीर अलिखित करार आहे. तो म्हणजे मी जेव्हा घरी येतो तेव्हा दरवाजा तीच उघडणार. खरच, दमून घरी आल्यावर तिचा चेहरा बघून सर्व शीण निघून जातो. तुझ्या असण्याने प्रेमाचा अर्थ समजला...' याहून वेगळा या अनुभवाचा अर्थ तरी काय काढावा? जर आम्ही दोघेही बाहेरून एकत्र घरी आलो तर ती दार उघडते आणि आत जाते. नंतर मी बेल वाजवतो व ती दार उघडते. तिला मी नेहमी सांगतो, ज्या दिवशी मला चावीने घरचे दार उघडायला लागेल, तो माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस असेल.

संपूर्ण आयुष्याकडे पुन्हा मागे वळून पाहताना, असा एकही महत्वाचा क्षण दिसत नाही जिथे ती सोबत न्हवती. माझे आईवडील, मुली आणि माझ्यासाठी तिने आजवर घेतलेल्या अथक परिश्रमांसाठी मानावे तेवढे आभार कमी आहेत. अनेक कथांमध्ये पत्नीने पतीसाठी केलेल्या त्यागाचे गोडवे गायले गेले आहेत. या पुण्यापासून आम्ही पुरुष मात्र कायम वंचित राहिलो आहोत. म्हणूनच वटपौर्णिमेला जशी ती जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे हि प्रार्थना करते तसेच मी हि रोज देवापुढे प्रार्थना करतो कि शुभदाच मला जन्मोजन्मी पत्नी म्हणून लाभू दे!

- गिरीश सुखठणकर

आज गिरीश-शुभदा यांच्या लग्नाचा ३९ वा वाढदिवस! या सुखी दाम्पत्यास अनेक शुभेच्छा!

- The Last Nomad

27 Mar 2019

Review: किरवंत

किरवंत किरवंत by Premanand Gajvi
My rating: 0 of 5 stars

जातीच्या नावाने वर्षानुवर्षे होणारे राजकारण वगळले तर, जातीबद्दल कुतूहल असणार्यापैकी मी आहे. नाही, जातीभेद वगैरे मानण्यासाठी नव्हे तर मुळात विशिष्ट जात म्हटली की एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडते म्हणून. आपण मराठीत क्लासिफिकेशन म्हणतो तेच काम जात करते. नंतर आपल्या करंटेपणामुळे ती नासली.

आपल्यातल्या भेदांचा आनंद घेण्याची संधी जात देते. आता संगीत आणि खाद्यसंस्कृतीचंच उदाहरण घ्या ना. गायकाचा आवाज विशिष्ट जातीचाच असला की आपल्याला खूप भावतो. आज भाजी मिळून नाही आली, भाजीची जात वेगळी होती असं आधीच्या पिढीत सहज म्हटलं जायचं. रंगाची जात, कापडाची जात, मातीची जात अशा असंख्य ठिकाणी ही जात अवतरते. हा शब्दप्रयोग करताना मुळीच कोणतीही अस्पृश्यतेची पुसटशीही भावना नाहीये. तुमच्या माझ्यातल्या गुणांचे वेगळेपण स्वीकारण्याचा मोकळेपणा मात्र नक्कीच आहे. तुम्ही आम्ही सगळे समान असा बेगडी आविर्भाव मुळीच नाहीये.

पण ह्याच भेदांचा आधार घेऊन जेव्हा एखाद्याचे अधिकार डावलले जातात तेव्हा रूप घेतं किरवंत सारखं वेगळ्याच धाटणीतलं नाटक.

View all my reviews

12 Mar 2019

Introspection की आत्मचिंतन?

पाहता पाहता ७०-७२ वर्षात, हळू हळू आपण ग्लोबल होताना आपलं लोकल असणं विसरत गेलो हे कळलंच नाही.

संस्कृतीचं culture होऊन ती वास्तुसंग्रहलयात नटून बसली आहे. कचकड्याच्या वस्तू हाताळताना आपण विचारही तसाच करू लागलो. जुनं द्या फेकून, नवीन घ्या कर्ज काढून असा बराचसा प्रवास होताना दिसतोय.

कोशिंमबीर म्हटलं की जुनाट आणि salad with honey dressing काय ते trending. असो. आता याला  Introspection म्हणावं की आत्मचिंतन?


- The Last Nomad

8 Mar 2019

The best gift on International Women's Day!
" Not all things experienced can be understood... Not all things understood can be expressed"

It's so true in the case of the latest book I read " The Last Nomad" and it's left me speechless.. The book has been wonderfully written by Heramb Sukhathankar and tells the interesting story of Rahul and Ryan whose lives are intertwined in a way that you need to read it to know the story.


Goosebumps is what you shall get in certain situations... written in such a detailed way where you will be right there next to Ryan listening to what he says and seeing and feeling what he feels!!! Kudos and waiting for many more books to be released!!

- Lakshimi Shenoy (Goodreads)

What can be more wonderful a gift on the International Women's Day than this special appreciation from a woman. Thank you, Lakshimi!

Here are some of readers' favourite excerpts and a poem from the novella.


"Although every woman knew that the ruler was only exploiting her man’s helplessness, being dependent for food and safety, she couldn’t muster the courage to convince him about it."

"No matter how hard he tried in the previous week to make it tidy, it still lacked a woman’s
touch.
"

"I have always found understanding women to be beyond my grasp. My mama was one such woman I long to meet."

The poem...

"It was the promised poem, written with her eyeliner.

If I Were a Woman

If I were a woman
I would want to be cared
Not handled


The pleasure you seek in me
I would love to give more
When your eyes speak of the promise of trust
 

I hate being at your mercy
More than your support
I long for your company
 

Never was I lonelier before
Now without you
Loneliness is solitude
"

Use the Discount Code WOMAN to get your author-signed paperback copy at 10% discount on Instamojo (bit.ly/thelastnomad) or scan the QR code below.Are you from the Kindle gang? Follow bit.ly/tln_kindle.Don't forget to add it on your Goodreads shelf!

- The Last Nomad

15 Feb 2019

The day I learnt creative writing from 50 teachers!

"Imagine a room with 100 windows and a person peeping in through each window. Within the room is an object of which only one view/face is visible from a window. What should the observers do to view the object in its entirety?"

Thus began the session, nudging the participants to ponder over the scenario, and wondering what has it got to do with creative writing. "Isn't trying to look at the process of creative writing like this scenario? You are trying to grasp the entire view of some thing you may or may not have even a glimpse of. How can this be done without shattering the windows? The easiest way to do this is to move from the window to within the room; from being an observer to a participant. This workshop is aimed at facilitating the shift!"

The workshop held on 2nd February at D.G. Ruparel College, was organised by the multi-lingual student writers' group अkshaर.


From exploring the concept of creativity to creative writing, the session progressed forth by focusing on the fundamentals of the writing process. The relation between senses (hearing and sight), meaning, and words was explored through individual activities, followed by discussion.The workshop progressed through interspersed interaction with participants on the process of creative writing. "How to deal with the writer's block" was one segment which all the participants thoroughly seem to have enjoyed.The group activity designed around 'Navrasas - the nine emotions' acted as a good culminating point to all the previous segments.The time after certificate distribution and vote of thanks, turned into a memorable evening. One of the students, Mrunmayee Damle presented a song by whistelling with such perfection that it was really mesmerizing! Students buying copies of my novella, The Last Nomad, turned into an unplanned book signing event. Another highlight of this workshop was receiving the handmade bookmarks and the pop-up greeting card which had snaps of my Ruparel years.


The patience of students happily sitting through the extended hour and participating enthusiastically was a good feedback in this second session on Creative Writing. After analyzing students' feedback from the survey form, I am working on developing specialized sessions on creative writing.

Seeing the blooming Aboli/Crossandra plant every morning, which was given during the inaugration of the workshop, will always remind me of this day where I learnt from 50 teachers at the same time.- The Last Nomad

4 Feb 2019

The India Pen Show | Day 2


Nothing could have been more wonderful than visiting an international fountain pen show right within your city limits, where you can touch a boru (reed pen) and a Parker Limited Edition (worth a fortune!) at the same time. It was like swimming in a sea of colourful pens and inks with fellow fountain pen lovers.Organised as a tribute To Kaifi Azmi (on his Birth Centenary) at the Nehru Centre, the show was indeed delightful. Interspersed with workshops on calligraphy and poetry, there were stalls from the most amazing pen collectors and traders from the country, with the top most brands exhibiting their collections.


The highlight for me was meeting Noopur Datye (Type Designer, Co-Founder) from Aksharaya and learning about Devanagari Calligraphy, a subject I have been curious about from quite some time post Girish Dalvi's (also a Co-Founder of Aksharaya) lecture in a LateX workshop.


I should not miss telling you about meeting Mr. M Pandurangan, from the family that keeps ink pens relevant, today known as the owner of Ranga Pens from Thiruvallur, Tamil Nadu, which has become an international brand.

Ranga pens


Here are some glimpses from the show and my collectibles: Badges + Reed Pen + Fountain Pen + Devanagari Calligraphy book!
My collectiblesI am also trying to restore grandpa's "Sheaffer Feather Touch 500 Fountain Pen with 14K Gold Nib" and other fountain pens stolen by time but more on that in another post.

Know more about The India Pen Show and Aksharaya(Letter Conscious People).

- The Last Nomad