20 May 2016

कविता: दाट माणसं, विरळ माणसं

माणसं
निर्ढावलेली, मग्रूर
पोटाच्या भरलेल्या घड्यावरून हात फिरवत
करपट ढेकर देणारी
प्रत्येक क्षणी चौफेर आपली वखवखली नजर उधळणारी
विरळ माणसं

माणसं,
ताठ कण्याने चालणारी
पाठपोठ एक झालेली
उपाशी पोटाच्या खळगीत खूप प्रेम साठवलेली
दाट माणसं

- हेरंब
ISupportNAAM

No comments: