"The best way to make a friend is
to tickle the child in a person"
१० ऑक्टोबर १९७८ ची संध्याकाळ मी कधीही विसरू शकणार नाही. माझी पत्नी सौ. शुभदा आणि मी, गंगाधर निवास, दादर च्या गॅलरी मध्ये उभे राहून पावसाची मजा पाहत होतो. हवेतला गारवा मनातील उत्कंठेला गुदगुल्या करत होता. मला शुभदा बऱ्याच दिवसापासून आवडायची पण तिला कसे विचारावे या तगमगितच १ वर्ष निघून गेले. पाऊस हा प्रेमवीरांचा आवडता ऋतू का असेल याचा प्रत्यय येत होता. एकमेकांबद्दल प्रकट न केलेल्या भावना या ऋतूत अंकुरित होत होत्या. त्या दिवशी मात्र मी धीर करून शुभदाला विचारले, 'माझ्याशी लग्न करशील का?'. तिनेही लगेच होकार दिला. आपल्या माणसाच्या फक्त समोर असण्यानेच चिंब पावसातही एक वेगळीच उब जाणवू लागते याचा अनुभव मी घेत होतो. संपूर्ण आभाळ ढगाळ असतानाहि शुभदाच्या चेहरा पाहून माझ्या मनात, छोटा गंधर्वांचं, 'चांद माझा हा हसरा' हे पद आपोआप वाजू लागलं होत. त्यावेळी तिचे वय होते १६ वर्षे आणि माझे २१ वर्षे. दोघांच्याही घरून होकार आला आणि ३० मार्च १९८० रोजी आमचा विवाह झाला. पण लग्न म्हणजे नेमकी काय चीज असते हे समजावणारी खरी गम्मत पुढे घडणार होती. शुभमंगल सावधान! लग्नापासून आम्ही कायम माझ्या
Comments