अंगणातल्या रातराणीच्या सुगंधात रेंगाळताना, सह्याद्रीतल्या जीर्ण गडाच्या तटबंदीवर वाऱ्याशी बोलताना, कुठल्यातरी पायवाटेवर वेळकाळ विसरून चालत जाताना, त्याला नेमकं वाटत होतं, 'ह्याच निवांत क्षणांसाठी तर सारी धडपड सुरु आहे'. पण मग विचार आला, 'पाहू, रिटायर झाल्यावर'. - हेरंब ISupportNAAM
१० ऑक्टोबर १९७८ ची संध्याकाळ मी कधीही विसरू शकणार नाही. माझी पत्नी सौ. शुभदा आणि मी, गंगाधर निवास, दादर च्या गॅलरी मध्ये उभे राहून पावसाची मजा पाहत होतो. हवेतला गारवा मनातील उत्कंठेला गुदगुल्या करत होता. मला शुभदा बऱ्याच दिवसापासून आवडायची पण तिला कसे विचारावे या तगमगितच १ वर्ष निघून गेले. पाऊस हा प्रेमवीरांचा आवडता ऋतू का असेल याचा प्रत्यय येत होता. एकमेकांबद्दल प्रकट न केलेल्या भावना या ऋतूत अंकुरित होत होत्या. त्या दिवशी मात्र मी धीर करून शुभदाला विचारले, 'माझ्याशी लग्न करशील का?'. तिनेही लगेच होकार दिला. आपल्या माणसाच्या फक्त समोर असण्यानेच चिंब पावसातही एक वेगळीच उब जाणवू लागते याचा अनुभव मी घेत होतो. संपूर्ण आभाळ ढगाळ असतानाहि शुभदाच्या चेहरा पाहून माझ्या मनात, छोटा गंधर्वांचं, 'चांद माझा हा हसरा' हे पद आपोआप वाजू लागलं होत. त्यावेळी तिचे वय होते १६ वर्षे आणि माझे २१ वर्षे. दोघांच्याही घरून होकार आला आणि ३० मार्च १९८० रोजी आमचा विवाह झाला. पण लग्न म्हणजे नेमकी काय चीज असते हे समजावणारी खरी गम्मत पुढे घडणार होती. शुभमंगल सावधान! लग्नापासून आम्ही कायम माझ्या
(Update: First edition is no longer available. The new edition will be published soon with more stories.) An excerpt from one of the stories: डिव्हायडर "आजूबाजूने वेगाने जाणाऱ्या दुतर्फा गाड्या. मधे डिव्हायडर. त्यावर तो, त्याची पेण्टिण्ग्स आणि पुस्तकं. वाऱ्यामुळे उडणारी दाढी त्याच्या टीशर्ट शी खेळत होती. कानातल्या इअरफोन्स मधे कुमार गंधर्वांच्या आवाजात कबीर गात होते, "माया महा ठग्नी हम जानी". " कथांचा जन्म कुठे आणि केव्हा होईल हे सांगणं कठीण. अशाच काही कथांनी अवेळी जन्म घेतला. या कथा "मेंढी, वॉचमन व इतर लघुकथा" या पुस्तकातून मांडताना आनंद होत आहे. मेंढी, वॉचमन व इतर लघुकथा - हेरंब महेश सुखठणकर Share your review/thoughts on the book with me on Goodreads: https://www.goodreads.com/book/show/28790699-mendhi-watchman-va-itar-laghukatha - हेरंब ISupportNAAM
Comments