कविता: सरळसोट

हातावर बसलेला रुळाचा मार लपवत
शाळा सुटल्यावर आम्ही दोघे रेल्वेच्या रुळावरून चालत होतो
त्याची चूक इतकीच होती
साईन, कॉस, आणि टॅनच्या रेषात त्याला
जगण्याची गम्मत दिसत नव्हती
रूळ सरळ सरळ चालत गेलेले पहिले
आणि आम्ही पायवाट धरली छोट्या तळ्याकडे जाणारी

- हेरंब

This poem has won the Wingword 2019 Poetry Prize.



Comments