कविता: बुद्धाचं दिवास्वप्न

What happens when Buddha, the enlightened one, lands in our city one day after more than 2000 years?

रखरखत्या उनात उभ्या असलेल्या
वातानुकूलन यंत्राच्या वेंटिलेटरवर तगलेल्या
निष्प्राण इमारतींच्या शहरात
एक दिवस बुद्ध पुन्हा अवतरला
हातात बोधीवृक्षाचं रोप घेऊन
मातीच्या शोधात

मातीच्या मरणानंतर खूप काळ लोटला होता
पण बुद्धाचा दोष न्हवता काहीच अनभिज्ञ असण्यात
तो ध्यानात मग्न होता
आणि माती आपल्याच मुलांकडून रक्तबंबाळ होत होती

सगळं शहर पिंजून थकलेल्या बुद्धाला
शहरातल्या एका पुलावर होर्डिंग दिसलं 'ट्री हाउज फॉर सेल'
आणि ज्ञान प्राप्त झाल्याचं
तो दिवास्वप्न पाहू लागला
- द लास्ट नोमॅड

A poem dedicated to everyone working for conversation of nature.
ISupportNAAM

Comments