Skip to main content

Story for Kids | दाणा आणि पाणी
एक होती चिऊ ताई. भर दुपारी सूर्य माथ्यावर आलेला असताना तिला तहान लागली. पण या चिउचि  होती एक समस्या. तिच्या एका पंखाला दुखापत झाल्यामुळे तिला काही उडता येत न्हव्त. चिऊ ताई एकटीच राहत असे कारण तिचं लग्न अजून झालं न्हव्त. नक्की तहान कशी भागवायची या विवंचनेत असताना तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. काही विचारांनी ती इतकी भयभीत झाली की तिला आपला शेवट जवळ आला असंच वाटू लागलं.
चिऊताई बसलेल्या त्या चिकूच्या झाडावर नुकतीच फळे लागायला सुरुवात झाली होती. त्यामुळे चिकूचा गोड रस चाखायला अजून काही मुंग्यांची वर्दळ सुरु झाली न्हवती. अचानक चिऊताईच्या घरट्यात एक भला मोठा पानाचा द्रोण येउन पडला. घाबरलेल्या चिऊताईची भीती अधिक बळावली. वरच्या फांदीवर पाहता तिला काही मुंग्या खाली येताना दिसल्या. आता ह्या मुंग्या नक्की आपल्याला मारणार असा तिचा समज झाला.
जसजशा त्या मुंग्या जवळ येऊ लागल्या तसे चिऊ ताईने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. काही क्षण कोणतीच हालचाल जाणवल्याने तिने हळूच एक डोळा उघडून पहिले तर मुंग्यांची एक लांबच लांब रांग एक एक पाण्याचा थेंब घेऊन येत होती आणि त्या पानाच्या द्रोणात रिता करत होती. पाहता पाहता तो द्रोण पाण्याने भरून घेला आणि चिऊताईची तहान भागली.

काही दिवसापूर्वी याच मुंग्यांना अन्नाचा तुटवडा असताना नकळतपणे चिउताइच्या चोचीतून काही गव्हाचे दाणे पडले होते. ह्या नकळतपणे केलेल्या उपकाराची जाणीव त्या मुंग्यांनी राखली होती. चिऊताईला मात्र हा चमत्कारच वाटला होता.

- हेरंब
ISupportNAAM

Comments

Hema said…
Farach chhan, Heramb! Majhya mulila avdel hi story!
The Last Nomad said…
Thank you Hema! Nakki sanga tila hi gosht :-)

Popular posts from this blog

हे बंध रेशमाचे [अतिथी लेखक: गिरीश सुखठणकर]

१० ऑक्टोबर १९७८ ची संध्याकाळ मी कधीही विसरू शकणार नाही. माझी पत्नी सौ. शुभदा आणि मी, गंगाधर निवास, दादर च्या गॅलरी मध्ये उभे राहून पावसाची मजा पाहत होतो. हवेतला गारवा मनातील उत्कंठेला गुदगुल्या करत होता. मला शुभदा बऱ्याच दिवसापासून आवडायची पण तिला कसे विचारावे या तगमगितच १ वर्ष निघून गेले. पाऊस हा प्रेमवीरांचा आवडता ऋतू का असेल याचा प्रत्यय येत होता. एकमेकांबद्दल प्रकट न केलेल्या भावना या ऋतूत अंकुरित होत होत्या. त्या दिवशी मात्र मी धीर करून शुभदाला विचारले, 'माझ्याशी लग्न करशील का?'. तिनेही लगेच होकार दिला. आपल्या माणसाच्या फक्त समोर असण्यानेच चिंब पावसातही एक वेगळीच उब जाणवू लागते याचा अनुभव मी घेत होतो. संपूर्ण आभाळ ढगाळ असतानाहि शुभदाच्या चेहरा पाहून माझ्या मनात, छोटा गंधर्वांचं, 'चांद माझा हा हसरा' हे पद आपोआप वाजू लागलं होत. त्यावेळी तिचे वय होते १६ वर्षे आणि माझे २१ वर्षे. दोघांच्याही घरून होकार आला आणि ३० मार्च १९८० रोजी आमचा विवाह झाला.  पण लग्न म्हणजे नेमकी काय चीज असते हे समजावणारी खरी गम्मत पुढे घडणार होती. शुभमंगल सावधान! लग्नापासून आम्ही कायम माझ्या

My First Self Published Marathi Short Stories | Read Now

(Update: First edition is no longer available. The new edition will be published soon with more stories.) An excerpt from one of the stories: डिव्हायडर "आजूबाजूने वेगाने जाणाऱ्या दुतर्फा गाड्या. मधे डिव्हायडर. त्यावर तो, त्याची पेण्टिण्ग्स आणि पुस्तकं. वाऱ्यामुळे उडणारी दाढी त्याच्या टीशर्ट शी खेळत होती. कानातल्या इअरफोन्स मधे कुमार गंधर्वांच्या आवाजात कबीर गात होते, "माया महा ठग्नी हम जानी". " कथांचा जन्म कुठे आणि केव्हा होईल हे सांगणं कठीण. अशाच काही कथांनी अवेळी जन्म घेतला. या कथा "मेंढी, वॉचमन व इतर लघुकथा" या पुस्तकातून मांडताना आनंद होत आहे. मेंढी, वॉचमन व इतर लघुकथा - हेरंब महेश सुखठणकर Share your review/thoughts on the book with me on Goodreads:  https://www.goodreads.com/book/show/28790699-mendhi-watchman-va-itar-laghukatha - हेरंब ISupportNAAM

Poem: Nomads in Love

Let us wander every inch of this earth Like nomads in search of nothing It is silly to gather in this life so brief How much love will we horde after all? For all pleasure we seek is love in disguise And it is never enough to love - हेरंब ISupportNAAM