Skip to main content

Reading at Katha Kathan's Open Mic

Nothing could have made this weekend more special than discovering Jameel Gulrays sir's Katha Kathan.

After having planned for several months to attend at least one of their events, I finally happened to be at their Baithak on Teacher.

Katha Kathan is an initiative by Jameel Gulrays sir and his team to revive the Indian language literature.

Here's the poem I read along with the translation.

तूच तुझा गुरू हो

कोण शिष्य कोण गुरू
आभासाच्या बाजारी मांडलेले
तू आणि मी, मातीची फक्त बोलके घट
घडवणारा, विकणारा आणि विकत घेणारा एकच
सर्वत्र तूच आहेस हे जाण आणि तूच तुझा गुरू हो

पण त्या आधी
या बाजारात वावरताना थोडा सावध हो
जी रिकामी मडकी शेंदूर फासून देव झालीयेत
ती फुटून जाऊ देत स्वतःच, पोकळ असण्याच्या जाणिवेने
मग उरेल फक्त माती आणि ती पुन्हा एकच सत्य सांगेल
सर्वत्र तूच आहेस हे जाण आणि तूच तुझा गुरू हो

पण अखंडाच्या जाणिवेत विरघळण्याधी जरा थांब
त्या फुटलेल्या घटातून ध्वनित होणारा नाद नीट ऐक
त्या नादातही तुझ्याच असण्याचं गाणं आहे
तुला सतत पडणाऱ्या सुखाच्या भुकेच्या प्रश्नांना उत्तराची गरजच काय?
हे प्रश्न तुझ्या त्याच विस्मरणातून निर्माण होतायत
सर्वत्र तू आणि फक्त तूच आहेस हे जाण आणि तूच तुझा गुरू हो

मला वाटलंच होतं, तू अजून इथेच रेंगाळणार
पण पुन्हा नवीन घट होण्याची आस कशाला?
आणि माती होण्याची भीतीही का?
तुला एक क्षणही नसण्याचं पुसटसं स्मरण तरी आहे का?
तू आणि फक्त तूच आहेस, हे आता तरी जाण आणि तूच तुझा गुरू हो

[Translation]

Be your own teacher

Who can tell the difference between a student and a teacher?
Arranged in the market of illusion
You and me, are speaking pots of clay
The maker, seller, and buyer are the same
Realise that you are everywhere and be your own guru

But wait
Be careful when treading the streets of this market
Let the empty pots, coloured in vermilion, which have become gods
Break after realising their own emptiness
And all that will be left is the soil, speaking the only truth
Realise that you are everywhere and be your own guru

Wait a moment before dissolving in the realisation of the unbound
Listen carefully to the sound coming from the broken pots
In that sound is the song of your being
What is the need to find solutions to the questions of hunger for happiness that hound you all the time?
These questions are born from your same forgetfulness
Realise that you are everywhere and be your own guru

I was certain, that you'll still be loitering here
Why the desire to become a new pot?
And why dread of becoming the soil?
Do you even have a faint memory of non-existence?
It's time you realise that it's only you who are everywhere and be your own guru



- The Last Nomad

Comments

Popular posts from this blog

मराठी कविता | पाहू रिटायर झाल्यावर

अंगणातल्या रातराणीच्या सुगंधात रेंगाळताना, सह्याद्रीतल्या जीर्ण गडाच्या तटबंदीवर वाऱ्याशी बोलताना, कुठल्यातरी पायवाटेवर वेळकाळ विसरून चालत जाताना, त्याला नेमकं वाटत होतं, 'ह्याच निवांत क्षणांसाठी तर सारी धडपड सुरु आहे'. पण मग विचार आला, 'पाहू, रिटायर झाल्यावर'. - हेरंब ISupportNAAM

हे बंध रेशमाचे [अतिथी लेखक: गिरीश सुखठणकर]

१० ऑक्टोबर १९७८ ची संध्याकाळ मी कधीही विसरू शकणार नाही. माझी पत्नी सौ. शुभदा आणि मी, गंगाधर निवास, दादर च्या गॅलरी मध्ये उभे राहून पावसाची मजा पाहत होतो. हवेतला गारवा मनातील उत्कंठेला गुदगुल्या करत होता. मला शुभदा बऱ्याच दिवसापासून आवडायची पण तिला कसे विचारावे या तगमगितच १ वर्ष निघून गेले. पाऊस हा प्रेमवीरांचा आवडता ऋतू का असेल याचा प्रत्यय येत होता. एकमेकांबद्दल प्रकट न केलेल्या भावना या ऋतूत अंकुरित होत होत्या. त्या दिवशी मात्र मी धीर करून शुभदाला विचारले, 'माझ्याशी लग्न करशील का?'. तिनेही लगेच होकार दिला. आपल्या माणसाच्या फक्त समोर असण्यानेच चिंब पावसातही एक वेगळीच उब जाणवू लागते याचा अनुभव मी घेत होतो. संपूर्ण आभाळ ढगाळ असतानाहि शुभदाच्या चेहरा पाहून माझ्या मनात, छोटा गंधर्वांचं, 'चांद माझा हा हसरा' हे पद आपोआप वाजू लागलं होत. त्यावेळी तिचे वय होते १६ वर्षे आणि माझे २१ वर्षे. दोघांच्याही घरून होकार आला आणि ३० मार्च १९८० रोजी आमचा विवाह झाला.  पण लग्न म्हणजे नेमकी काय चीज असते हे समजावणारी खरी गम्मत पुढे घडणार होती. शुभमंगल सावधान! लग्नापासून आम्ही कायम माझ्या

My First Self Published Marathi Short Stories | Read Now

(Update: First edition is no longer available. The new edition will be published soon with more stories.) An excerpt from one of the stories: डिव्हायडर "आजूबाजूने वेगाने जाणाऱ्या दुतर्फा गाड्या. मधे डिव्हायडर. त्यावर तो, त्याची पेण्टिण्ग्स आणि पुस्तकं. वाऱ्यामुळे उडणारी दाढी त्याच्या टीशर्ट शी खेळत होती. कानातल्या इअरफोन्स मधे कुमार गंधर्वांच्या आवाजात कबीर गात होते, "माया महा ठग्नी हम जानी". " कथांचा जन्म कुठे आणि केव्हा होईल हे सांगणं कठीण. अशाच काही कथांनी अवेळी जन्म घेतला. या कथा "मेंढी, वॉचमन व इतर लघुकथा" या पुस्तकातून मांडताना आनंद होत आहे. मेंढी, वॉचमन व इतर लघुकथा - हेरंब महेश सुखठणकर Share your review/thoughts on the book with me on Goodreads:  https://www.goodreads.com/book/show/28790699-mendhi-watchman-va-itar-laghukatha - हेरंब ISupportNAAM