'सोशल मीडिया' या विषयावर नवीन पुस्तक का लिहिले?सध्याचे कोविड-१९ चे दिवस म्हणजे ‘वायरल’ या शब्दाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला काळ. नोवेल कोरोनावायरस बरोबर अनेक गोष्टी ‘वायरल’ झाल्या. 

अशा या अत्यंत अनिश्चिततेच्या काळात, जेव्हा जवळ जवळ सगळ्याच देशांची पाऊले थबकली, तेव्हा दुप्पट गतीने सुरु झाला आपला आंतरजालावरचा, म्हणजेच इंटरनेटवरचा प्रवास. सगळ्या गोष्टी ऑनलाईन कशा सुरु करता येतील याकडे सगळ्यांनी कूच केली. मनोरंजन, शिक्षण, वैद्यकीय सल्ला, आरोग्यसेवा, खाद्य उद्योग आणि अशा अनेक गोष्टी बघता बघता घरपोच येऊ लागल्या.

पण या सगळ्यात समाजमाध्यमांचे, म्हणजेच सोशल मीडियाचे, एक वेगळेच रूप आपल्या समोर आले. एकंदर परिस्थितीबद्दलचा राग, द्वेष, टीका, राजकीय चर्चा(भांडणे!) यांना उधाण आले. हा सगळा भावनांचा उद्रेक होणं जरी सद्य:स्थितीत स्वाभाविक वाटलं तरी या पूर्वीही सोशल मीडियाचा उत्तम वापर नेमका कसा करायचा यावर खरच आपण विचार केला होता का? 

हे माध्यम केवळ विरंगुळ्यापुरतेच मर्यादित आहे का? की याच्या दुसऱ्या आयामांकडे आपण दुर्लक्ष केले? सोशल मीडिया या गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या पण अनेक संधी असणाऱ्या विश्वात सावधपणे वावरून यशस्वी कसे होता येईल याचा सोप्पा मार्ग या पुस्तकात उलगडला आहे.

आशा आहे की हे पुस्तक खास करून अधिकाधिक तरुण मित्र-मैत्रिणी पर्यंत पोहोचेल आणि सर्व वाचकांना सोशल मीडियाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टीकोन देईल!

ई-बुक, किंडल, आणि छापिल स्वरुपात 'पोथी.कॉम', 'ऍमेझॉन', आणि 'नोशन प्रेस' या ऑनलाईन दुकानात उपलब्ध.
तुमची प्रत मिळवण्यासाठी पुढील दुवा (लिंक) वापरा: Insight Stories | Web Store


- The Last Nomad


Comments