जखम (Marathi Poem) by Anu Shah | Words Can Heal

जखम 


नातं आणि मन जखमांनी रक्तबंबाळ होऊन वाहायला लागतं

तेव्हा तिचा आटोकाट प्रयत्न नाती जपण्याचा

फारच केविलवाणा वाटायला लागतो

तिला नेहमीच सवय, उसवलं की शिवायची 

टराटरा कपडे फाडावेत तसं

तिच्या मनाच्या हजार चिंध्या करून 

तो एकदम निर्धास्त

कसलीच तमा नसल्यासारखा

आणि ती मात्र आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे

ठिगळ लावत केविलवाण्या प्रयत्नात

- अनु शाह

This posts was published as a part of the 'Words Can Heal' series. You too can participate and explore your creative side. To know more, read this blog post.

Comments