बसुनी तीरी प्रतिबिंब ते,
चंद्राचे ती पाहीत असे.
पाहुनी चंद्रमा आठवी सजणा,
गोड कशी ती लाजित असे.
चंद्रमा जो माझ्या तिरी,
तुझ्या ही तो दारी असे.
दोघांत आपल्या एकच धागा,
चंद्र सखा तो जोडीत असे.
तरंगत शीतल पाण्यावरती,
माझ्याशी तो बोलीत असे.
साजण तुझा तुझ्याविना गं,
विरहाचे गीत गात असे.
अरे सख्या, जा सांग त्यांना,
गीत आमचे एक असे.
तुझ्याच सवे परतावे त्यांनी,
शृंगार माझा अपुर्ण असे.
बसुनी तीरी प्रतिबिंब ते,
चंद्राचे ती पाहीत असे.
- जागृती
Comments