शरद तांदळे लिखित द आंत्रप्रन्योर [Marathi Book Summary]

उद्योजकता या विषयावरील पुस्तकांना सुमार नाही. पण हे पुस्तक फार वेगळं आहे कारण यात निव्वळ success stories न मांडता किंवा तात्विक चर्चा न करता लेखक शरद तांदळे यांनी त्यांच्या आजवरच्या आयुष्याचा लेखाजोखा वाचकांपुढे ठेवला आहे. पुस्तकातील प्रत्येक नवीन प्रकरणात आयुष्यातील नवीन संघर्षाची कहाणी मांडली आहे.(Image Courtesy: miudyojak.com)


शून्यातून विश्व उभं करणे हे जर तुम्ही आजवर निव्वळ ऐकलं असेल तर लेखकाचं आयुष्य हे एक उत्तम उदाहरण आहे . उद्योजकता म्हणजे केवळ श्रीमंत होण्यासाठीची दौड नसून नवीन काहीतरी घडवण्याची एक रचनात्मक प्रक्रिया आहे हे या पुस्तकातून सध्या सोप्या भाषेत पुन्हा पुन्हा व्यक्त होतं. त्यामुळेच लेखक एका उद्योजकापेक्षा आपला मित्र जास्त वाटू लागतो.

लेखकाचा हा प्रवास जरी विस्मयचकित करून सोडणारा असला तरी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी आपल्याला पुन्हा जमिनीवर आणून वास्तविकतेचं भान दिल्याशिवाय राहत नाही.

आजवर वाचलेल्या प्रेरणादायी पुस्तकातून आपल्या आयुष्यात निष्फळ ठरलेले प्रयत्न फार कमी लेखक उघडपणे  मांडताना दिसले. परंतु या पुस्तकाने ही प्रथा  मोडीत काढून अपयशाच्या भीतीवर मात कशी करावी हे सहज सांगितलं आहे.

पुस्तकाच्या नावातच त्याचं सार दडलेलं मला जाणवलं. आंत्रप्रन्योर म्हणजे कधीही न थांबणारी, नवनिर्मितीचा ध्यास असलेली व्यक्ती. भविष्यात जरी तुम्ही उद्योजक होऊ इच्छित नसाल तरी हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या मनातील ध्यासाला एक नवीन दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. लेखकाचा हा प्रवास असाच सुरु राहो व इतरांना मार्गदर्शक ठरो या शुभेच्छा!

हे पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील लिंक follow करा: https://amzn.to/3mDw3Wp- The Last Nomad
Check out books from the Insight Stories webstore.

Comments