पुस्तक परिचय: डॉ. प्रकाश आमटे लिखित 'रानमित्र'




रानमित्र - डॉ. प्रकाश आमटे

सध्याच्या काळात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे लक्ष दिले तर असा प्रश्न नक्की पडू शकेल की माणूस आणि प्राणी यापैकी नेमकी कोणाची उत्क्रांती झाली आहे.
जर माणूस आणि प्राणी यांतील नात्यावर, सर्व तथाकथित पुस्तकी ज्ञान बाजूला ठेऊन, अभ्यास केला गेला तर Amte's Animal Ark किंवा डॉ. प्रकाश आमटे यांच्याच शब्दात सांगायचे तर 'गोकुळ' या विशेष ठिकाणाचा समावेश केल्याशिवाय हा अभ्यास पूर्ण होऊ शकणार नाही. खऱ्या अर्थाने Man vs Wild ऐवजी Man with the Wild याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आयुष्य. 

या पुस्तकाद्वारे माझ्यासारख्या शहरी संस्कृतीत वाढलेल्या वाचकांचे अनेक समज (खरे तर गैरसमजच जास्त) छान स्वच्छ होतील. बिबट्या, सिंह, माकडापासून ते अगदी मगर, तरस आणि सापांच्या सहवासात राहून आणि त्याचे स्वाभाविकपणे छोटेमोठे परिणाम भोगूनदेखील जर डॉ. आमटे प्राण्यांवर तितकेच प्रेम करू शकतात तर या पुस्तकातील अनुभव तुम्हाला प्राण्यांकडे एका नव्या नजरेतून पाहायला नक्कीच भाग पाडतील.

महाराष्ट्रातील चंद्रपूर सारख्या एका दुर्गम भागात राहून हे प्राण्यांचे अनाथालय चालवण्यामागची कथा डॉ. आमटेंनी निर्भीडपणे मांडली आहे. प्राणी सांभाळण्याचे कोणतेही शिक्षण किंवा सोय नसताना अगदी शून्यातून हे गोकुळ उभे करण्यामागची कथा भारावून सोडणारी आहे. हे पुस्तक प्रत्येकाने, विशेष म्हणजे शाळा कॉलेजात शिकणाऱ्या मित्रमैत्रिणींनी, वाचावे असेच आहे. घरात मनोरंजनाकरिता क्यूट आणि exotic प्राणी 'विकत' घेण्याच्या संस्कृतीला (की विकृतीला?) बळी पडण्यापूर्वी हे पुस्तक प्रत्येकाच्या हातात पडावे हीच आशा! हे पुस्तक वाचण्याकरिता किंवा भेट देण्याकरिता पुढील लिंक पहा.

रानमित्र
लेखक: डॉ. प्रकाश आमटे
पृष्ठ: १२०



- The Last Nomad
Check out books from the Insight Stories webstore.

Comments