एक दिवस शुभांगिनी मावशीचा फोन आला आणि एक पुस्तक संकलित करून प्रसिद्ध करण्यासंबंधी ती बोलू लागली. पुस्तक म्हटल्यावर माझेही कान टवकारले आणि त्यातच या पुस्तकातला मजकूर फार वेगळा होता. यात त्यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांतील मंडळींच्या कविता होत्या. त्यांच्या पंजोबांनी लिहिलेली गुरु दत्तात्रेयांवरची चक्क १५० वर्षांपूर्वीची भजने! जी आजही नरसोबाच्यावाडीला म्हटली जातात. त्याचबरोबर त्यांच्या आई, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका स्व. सुमन वरेरकर यांच्या असंख्य सुंदर कविता.
त्यामुळे हे केवळ एक पुस्तक नसून एका कुटुंबातील संग्रहित केलेला साहित्यिक आणि सांस्कृतिक आनंद देणारा महत्त्वाचा वारसा आहे असं मला वाटतंय.
'अंतरीचे तरंग' या काव्यसंग्रहाचे संकलन करण्यात आणि मूर्त स्वरूपात आणण्यात हातभार लावता आला याचा आनंद आहे. या कामात मला सहभागी करून घेतल्याबद्दल शुभांगिनी मावशी, रश्मी मावशी आणि त्यांच्या समस्त परिवाराचा मी आभारी आहे.
===================================================
अंतरीचे तरंग
"हा कवितांचा संग्रह चार पिढ्यांच्या कलाकृतीचा वारसा आहे."
बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी (श्री सदानंद वरेरकर) यांनी एक छोटेसे बाड दिले. त्यात होत्या माझ्या पणजोबा (श्री सीताराम परुळकर) आणि माझ्या आईच्या (सुमन वरेरकर) कविता. पणजोबांची तर साधारण १५० वर्षांपूर्वी लिहीलेली भजने यात समाविष्ट आहेत! त्यांना विश्वास होता की त्या कविता छापण्याचे कार्य मी पार पाडेन. पण प्रत्येक गोष्टीसाठी योग यावा लागतो.
'अंतरीचे तरंग' हा माझा सासर-माहेरचा एक अनमोल ठेवा आहे ज्याचे जतन व्हायला हवे या इच्छेने मी हा घाट घातला.
– शुभांगिनी अशोक जोशी
पुढील पैकी कोणताही दुवा वापरून तुम्ही (छापील किंवा ई-पुस्तक स्वरुपात) हे पुस्तक मागवू शकता.
(छापील/Paperback)
NotionPress: https://notionpress.com/in/read/antariche-tarang
Amazon: https://amzn.to/4n9nBwr
Flipkart: http://fkrt.it/LdLCjQuuuN
(ई-पुस्तक/E-book)
Kindle: https://amzn.to/4moTmAu
Comments