लातूर मधे मृत्यू होतायत पाण्याच्या रांगेत तिष्टत असलेल्यांचे आणि मुंबई न्हाऊन निघतेय रंगांनी तुम्हा सर्वांना हॅपी होळी विरोधकांना अजून एक संधी मिळालीये सरकारवर तोफ डागण्याची अजून एक अपयश माथी मारण्याची तुम्हा सर्वांना हॅपी होळी आपलं माणूस नसणं कसं कळणार पैसे देऊन पाणी विकत घेणार्यांना जाऊदे आपल्याला काय त्याचं तुम्हा सर्वांना हॅपी होळी विदर्भात २००० शेतकरी गेले न मोजलेल्यांची संख्या माहित नाही "अच्छे दिन" येणारेत, डोंट वरी तुम्हा सर्वांना हॅपी होळी देव सापडेल एकवेळ आपल्यातला माणूस दगड झालाय गोड लागत नाही आज पुरण पोळी तुम्हा सर्वांना हॅपी होळी - हेरंब ISupportNAAM