Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

World Stood Still by Aparna Kulkarni | Words Can Heal

She had a steak left unfinished, some moments yet to be cherished. She had a promise to keep  and a friend to meet.  But the world stood still  and nothing she could fulfil. She had a conversation to complete and some mistakes to repeat. She had confusions to be made and some goodbyes to be said. But the world stood still  and nothing she could fulfil. - Aparna Kulkarni This posts was published as a part of the 'Words Can Heal' series. You too can participate and explore your creative side. To know more,  read this blog post . Check out books from the Insight Stories shelf.

जखम (Marathi Poem) by Anu Shah | Words Can Heal

जखम  नातं आणि मन जखमांनी रक्तबंबाळ होऊन वाहायला लागतं तेव्हा तिचा आटोकाट प्रयत्न नाती जपण्याचा फारच केविलवाणा वाटायला लागतो तिला नेहमीच सवय, उसवलं की शिवायची  टराटरा कपडे फाडावेत तसं तिच्या मनाच्या हजार चिंध्या करून  तो एकदम निर्धास्त कसलीच तमा नसल्यासारखा आणि ती मात्र आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ठिगळ लावत केविलवाण्या प्रयत्नात - अनु शाह This posts was published as a part of the 'Words Can Heal' series. You too can participate and explore your creative side. To know more,  read this blog post . Check out books from the Insight Stories shelf.

Poem: Path of Innocence | Words Can Heal

We struggle to capture and live in time And even end up labelling it as money Until we encounter a moment which narrates in silence What it means to live beyond the clutches of time Then we can laugh at the fleeting feeling Of being in control of time Throw away our pretentious garbs And walk the path of innocence - The Last Nomad  This posts was published as a part of the 'Words Can Heal' series. You too can participate and explore your creative side. To participate,  read this blog post . Check out books from the Insight Stories shelf.

माझ्या आठवणीतली दिवाळी

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. थंडीचे दिवस होते. मुंबईतली असली तरी थंडीचं कौतुक (होतं आणि) आहे आम्हाला. शाळेतल्या मुलांकडे मोबाईल फोन नव्हता तेव्हाचा काळ. तेव्हा मिळणाऱ्या अनेक सुट्ट्यांपैकी सगळ्यात आतुरतेने वाट पाहायचो ती दिवाळीची. पण याचं कारण ही तितकच वेगळं होतं. नरक चतुर्दशीच्या पहाटे, चक्क चार साडेचारपासून घरी गजबज सुरु व्हायची. त्यावेळी आमच्या सोसायटीत एक प्रथा होती. सगळी मुलं नवीन कपडे घालून चक्क पहाटे सहा वाजेपर्यंत फटाक्याची पिशवी घेऊन मैदानात उतरायची. फटाके फोडून झाल्यावर घरी फराळ आणि मग पुन्हा खाली जाऊन धुमाकूळ. तर अशा पहाटे दादा तयार होत असताना, मी उठून खिडकीजवळच्या पलंगावर निजायचो. बाहेरच्या काळ्याकुट्ट आकाशाच्या पटलावर घरचा कंदिल संथपणे तरंगत असल्यासारखा वाटायचा. कितीतरी वर्षांपासून हा एकच कंदिल आम्ही लावत होतो ज्याचा आकार उडत्या तबकडीसारखा होता आणि त्याला छोट्या छोट्या अंडाकृती रंगीबेरंगी काचा होत्या.  दादाची हाक ऐकू येईपर्यंत पलंगावर पडून बाहेर त्या कंदिलाकडे पहात राहायचा छंद मला नकळतपणे लागला होता. मधेच कुठेतरी दूरवर एखादा फटाका फुटल्याचा आवाज यायचा आणि मग पुन्हा शां