Skip to main content

Posts

Showing posts from March, 2019

हे बंध रेशमाचे [अतिथी लेखक: गिरीश सुखठणकर]

१० ऑक्टोबर १९७८ ची संध्याकाळ मी कधीही विसरू शकणार नाही. माझी पत्नी सौ. शुभदा आणि मी, गंगाधर निवास, दादर च्या गॅलरी मध्ये उभे राहून पावसाची मजा पाहत होतो. हवेतला गारवा मनातील उत्कंठेला गुदगुल्या करत होता. मला शुभदा बऱ्याच दिवसापासून आवडायची पण तिला कसे विचारावे या तगमगितच १ वर्ष निघून गेले. पाऊस हा प्रेमवीरांचा आवडता ऋतू का असेल याचा प्रत्यय येत होता. एकमेकांबद्दल प्रकट न केलेल्या भावना या ऋतूत अंकुरित होत होत्या. त्या दिवशी मात्र मी धीर करून शुभदाला विचारले, 'माझ्याशी लग्न करशील का?'. तिनेही लगेच होकार दिला. आपल्या माणसाच्या फक्त समोर असण्यानेच चिंब पावसातही एक वेगळीच उब जाणवू लागते याचा अनुभव मी घेत होतो. संपूर्ण आभाळ ढगाळ असतानाहि शुभदाच्या चेहरा पाहून माझ्या मनात, छोटा गंधर्वांचं, 'चांद माझा हा हसरा' हे पद आपोआप वाजू लागलं होत. त्यावेळी तिचे वय होते १६ वर्षे आणि माझे २१ वर्षे. दोघांच्याही घरून होकार आला आणि ३० मार्च १९८० रोजी आमचा विवाह झाला.  पण लग्न म्हणजे नेमकी काय चीज असते हे समजावणारी खरी गम्मत पुढे घडणार होती. शुभमंगल सावधान! लग्नापासून आम्ही कायम माझ्या

Review: किरवंत

किरवंत by Premanand Gajvi My rating: 0 of 5 stars जातीच्या नावाने वर्षानुवर्षे होणारे राजकारण वगळले तर, जातीबद्दल कुतूहल असणार्यापैकी मी आहे. नाही, जातीभेद वगैरे मानण्यासाठी नव्हे तर मुळात विशिष्ट जात म्हटली की एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडते म्हणून. आपण मराठीत क्लासिफिकेशन म्हणतो तेच काम जात करते. नंतर आपल्या करंटेपणामुळे ती नासली. आपल्यातल्या भेदांचा आनंद घेण्याची संधी जात देते. आता संगीत आणि खाद्यसंस्कृतीचंच उदाहरण घ्या ना. गायकाचा आवाज विशिष्ट जातीचाच असला की आपल्याला खूप भावतो. आज भाजी मिळून नाही आली, भाजीची जात वेगळी होती असं आधीच्या पिढीत सहज म्हटलं जायचं. रंगाची जात, कापडाची जात, मातीची जात अशा असंख्य ठिकाणी ही जात अवतरते. हा शब्दप्रयोग करताना मुळीच कोणतीही अस्पृश्यतेची पुसटशीही भावना नाहीये. तुमच्या माझ्यातल्या गुणांचे वेगळेपण स्वीकारण्याचा मोकळेपणा मात्र नक्कीच आहे. तुम्ही आम्ही सगळे समान असा बेगडी आविर्भाव मुळीच नाहीये. पण ह्याच भेदांचा आधार घेऊन जेव्हा एखाद्याचे अधिकार डावलले जातात तेव्हा रूप घेतं किरवंत सारखं वेगळ्याच धाटणीतलं नाटक.

Introspection की आत्मचिंतन?

पाहता पाहता ७०-७२ वर्षात, हळू हळू आपण ग्लोबल होताना आपलं लोकल असणं विसरत गेलो हे कळलंच नाही. संस्कृतीचं culture होऊन ती वास्तुसंग्रहलयात नटून बसली आहे. कचकड्याच्या वस्तू हाताळताना आपण विचारही तसाच करू लागलो. जुनं द्या फेकून, नवीन घ्या कर्ज काढून असा बराचसा प्रवास होताना दिसतोय. कोशिंमबीर म्हटलं की जुनाट आणि salad with honey dressing काय ते trending. असो. आता याला  Introspection म्हणावं की आत्मचिंतन? - The Last Nomad

The best gift on International Women's Day!

" Not all things experienced can be understood... Not all things understood can be expressed" It's so true in the case of the latest book I read " The Last Nomad" and it's left me speechless.. The book has been wonderfully written by Heramb Sukhathankar and tells the interesting story of Rahul and Ryan whose lives are intertwined in a way that you need to read it to know the story. Goosebumps is what you shall get in certain situations... written in such a detailed way where you will be right there next to Ryan listening to what he says and seeing and feeling what he feels!!! Kudos and waiting for many more books to be released!! - Lakshimi Shenoy ( Goodreads ) What can be more wonderful a gift on the International Women's Day than this special appreciation from a woman. Thank you, Lakshimi! Here are some of readers' favourite excerpts and a poem from the novella. " Although every woman knew that the ruler was only exploiting h