Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

कविता: तू ठरवलस तर...

तू ठरवलस तर होऊ शकतोस बुद्ध, नाहीतर राहशील राजपुत्र गौतम बनून सोन्याच्या अदृश्य पिंजऱ्यात. तू ठरवलस तर होऊ शकतो रात्रीचा दिवस, आणि थांबेल काळही त्याचा निर्लेप गाभा उघडून तुला पाहण्याकरिता. तू ठरवलस तर होऊ शकतोस मुक्त प्रवाहाच्या लाटेतून, नाहीतर वहात जाशील निष्प्राण ओंडक्यांसारखा नशिबाला दोष देत. तू ठरवलस तर अशक्य हा फक्त एक शब्द म्हणून उरेल, आणि प्रकाश शोधणाऱ्यांच्या हृदयात पणतीची ज्योत होऊन तेवत राहशील. (बाबा आमटेंना समर्पित) - The Last Nomad