28 May 2016

कविता: बेफिकीर

A poem on rain through the eyes of someone who has experience drought.

धरती च्या उदरात
काळ्याकभिन्न कातळात
इतकी माया दडलीये
तरीही आपण का करतोय आरोप तिचा पान्हा नीरस झाल्याचा?

तीन महिने तो हवा तसा बेफिकीर बरसून गेल्यावर
पुढचे नऊ मास
तिच्या प्रेमाचा पान्हा
कदाचित आठला हि नसता
जर आपल्याला वेळीच बापाची किंमत कळली असती


- हेरंब
ISupportNAAM

25 May 2016

कविता: बुद्धाचं दिवास्वप्न

What happens when Buddha, the enlightened one, lands in our city one day after more than 2000 years?

रखरखत्या उनात उभ्या असलेल्या
वातानुकूलन यंत्राच्या वेंटिलेटरवर तगलेल्या
निष्प्राण इमारतींच्या शहरात
एक दिवस बुद्ध पुन्हा अवतरला
हातात बोधीवृक्षाच रोप घेऊन
मातीच्या शोधात

मातीच्या मरणानंतर खूप काळ लोटला होता
पण बुद्धाचा दोष न्हवता काहीच अनभिज्ञ असण्यात
तो ध्यानात मग्न होता
आणि माती आपल्याच मुलांकडून रक्तबंबाळ होत होती

सगळं शहर पिंजून थकलेल्या बुद्धाला
शहरातल्या एका पुलावर होर्डिंग दिसलं 'ट्री हाउस फॉर सेल'
आणि ज्ञान प्राप्त झाल्याचं
तो दिवास्वप्न पाहू लागला


- हेरंब

A poem dedicated to everyone working for conversation of nature.
ISupportNAAM

21 May 2016

कविता: सरळसोट

हातावर बसलेला रुळाचा मार लपवत
शाळा सुटल्यावर आम्ही दोघ रेल्वेच्या रुळावरून चालत होतो
त्याची चूक इतकीच होती
साईन, कॉस, टॅन च्या रेषात त्याला
जगण्याची गम्मत दिसत न्हवती
रूळ सरळ सरळ चालत गेलेले पहिले
आणि आम्ही पायवाट धरली छोट्या तळ्याकडे जाणारी

- हेरंब
ISupportNAAM

20 May 2016

कविता: दाट माणसं, विरळ माणसं

माणसं
निर्ढावलेली, मग्रूर
पोटाच्या भरलेल्या घड्यावरून हात फिरवत
करपट ढेकर देणारी
प्रत्येक क्षणी चौफेर आपली वखवखली नजर उधळणारी
विरळ माणसं

माणसं,
ताठ कण्याने चालणारी
पाठपोठ एक झालेली
उपाशी पोटाच्या खळगीत खूप प्रेम साठवलेली
दाट माणसं

- हेरंब
ISupportNAAM

17 May 2016

Story for Kids in Mumbai Times | खट्याळ गंपू

Glad to share with you my story for kids published in today's Mumbai Times(a supplement of Maharashtra Times). Do read it for your tiny tots.

Read Online: http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31829&articlexml=17052016104005


- हेरंब
ISupportNAAM

10 May 2016

A tribute to Grace

चैतन्याची चाहूल
देऊन तुम्ही हो गेला
तिमिरात शोधतो कविता
अन्  शब्द राहिले हाती
- हेरंब


Grace... that wasn't his real name. But who can separate what's real from the abstract? Just as he made the abstract and obscure seem more tangible through his poetry than the immediate real.

Today would have been his 79th birthday.

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा;
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा !
-ग्रेस 

Listen to Grace speaking at G A Mahotsav, where he was awarded the prestigious GA Sanman. It is held every year in the memory of litterateur GA Kulkarni.image courtesy: www.aathavanitli-gani.com


- हेरंब
ISupportNAAM

6 May 2016

कविता: दोन माणसं


दोन माणसं

एक, निखाऱ्यांची झळ लागते म्हणून
स्वतःच राख पांघरून बसलेला

दुसरा, त्याच निखाऱ्यांचा पलिता करून
प्रकाशवाटा शोधणारा


- हेरंब
ISupportNAAM

4 May 2016

Story for Kids | दाणा आणि पाणी
एक होती चिऊ ताई. भर दुपारी सूर्य माथ्यावर आलेला असताना तिला तहान लागली. पण या चिउचि  होती एक समस्या. तिच्या एका पंखाला दुखापत झाल्यामुळे तिला काही उडता येत न्हव्त. चिऊ ताई एकटीच राहत असे कारण तिचं लग्न अजून झालं न्हव्त. नक्की तहान कशी भागवायची या विवंचनेत असताना तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. काही विचारांनी ती इतकी भयभीत झाली की तिला आपला शेवट जवळ आला असंच वाटू लागलं.
चिऊताई बसलेल्या त्या चिकूच्या झाडावर नुकतीच फळे लागायला सुरुवात झाली होती. त्यामुळे चिकूचा गोड रस चाखायला अजून काही मुंग्यांची वर्दळ सुरु झाली न्हवती. अचानक चिऊताईच्या घरट्यात एक भला मोठा पानाचा द्रोण येउन पडला. घाबरलेल्या चिऊताईची भीती अधिक बळावली. वरच्या फांदीवर पाहता तिला काही मुंग्या खाली येताना दिसल्या. आता ह्या मुंग्या नक्की आपल्याला मारणार असा तिचा समज झाला.
जसजशा त्या मुंग्या जवळ येऊ लागल्या तसे चिऊ ताईने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. काही क्षण कोणतीच हालचाल जाणवल्याने तिने हळूच एक डोळा उघडून पहिले तर मुंग्यांची एक लांबच लांब रांग एक एक पाण्याचा थेंब घेऊन येत होती आणि त्या पानाच्या द्रोणात रिता करत होती. पाहता पाहता तो द्रोण पाण्याने भरून घेला आणि चिऊताईची तहान भागली.

काही दिवसापूर्वी याच मुंग्यांना अन्नाचा तुटवडा असताना नकळतपणे चिउताइच्या चोचीतून काही गव्हाचे दाणे पडले होते. ह्या नकळतपणे केलेल्या उपकाराची जाणीव त्या मुंग्यांनी राखली होती. चिऊताईला मात्र हा चमत्कारच वाटला होता.

- हेरंब
ISupportNAAM